स्वराज्याची नाविन्यपूर्ण माहिती आता फेसबुक वर सुद्धा
स्वराज्याचा घटनाक्रम
स्वराज्य स्थापनेच्या वेळचा आणि त्या नंतरच्या ठळक घटनांचा क्रम इथे दिला आहे. प्रत्येक महत्वाची घटना आपल्याला माहिती असते त्यामुळे पूर्ण घटनाक्रम डोळ्यासमोर असल्यास इतिहासाची सांगड घालणे सोपे जाते. इथे दिलेल्या ठळक घटनांच्या आजूबाजूला आणि मध्ये बऱ्याच इतर महत्वाच्या घटना घडल्या ज्यांना प्रकाशात आणणे हे ह्या संकेतस्थळाचे एक प्रमुख उद्देश्य
१४ व्या शतकाची सुरुवात
देवगिरीच्या यादव राजांचा अल्लाउद्दीन खिलजी कडून प्रभाव - ह्या लढाई नंतर महाराष्ट्रात चालू झाला जवळपास ३५० वर्षाचा परकीय राजवटीचा - सुलतानी , बहमनी आणि दक्षिणी पातशाह्यांचा जुलमी आणि अंधारमय कालखंड
१६ व्या शतकाची सुरुवात
बहमनी सत्तेचे ५ राजवटीत विभाजन - निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, इमादशाही आणि बरीदशाही. पहिल्या तीन टिकल्या , वाढल्या तर शेवटच्या २ हळू हळू अस्त पावल्या
इसवी सन १६३०
शिवाजी महारा जांचा फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ला शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला. परकीय गुलामगिरीत अडकलेल्या महाराष्ट्र भूमीला मिळाला आशेचा किरण
इसवी सन १६५९
स्वराज्याची पहिली अग्निपरीक्षा - एक अत्यंत धाडसी योजनेत अफजलखानाचा प्रतापगडच्या पायथ्याशी १० नोव्हेंबर १६५९ ला शिवाजी महाराजांकडून वध. पुढच्या काहीच दिवसात एक जबरदस्त धडक मोहिमेत आदिलशाही राजवटीतून बराच प्रदेश मुक्त करून स्वराज्याचा झपाट्याने विस्तार
इसवी सन १६६०
शिवाजी महाराज पन्हाळगडाला सिद्दी जौहरच्या वेढ्यात - १३ जुलै १६६० ला वेध्यातून धाडसी सुटका आणि विशाळगडाकडे प्रयाण. बाजीप्रभू देशपांडे आणि बांदलांचा घोडखिंडीत अचाट पराक्रम - महाराज सुखरूप विशाळगडी. शाईस्तेखानाची जवळपास ८० हजार ते १ लाख मोगली सैन्य घेऊन स्वराज्यात धडक
इसवी सन १६६३
१ लाख फौजेच्या गराड्यात घुसून शिवाजी महाराजांचा शाइस्तेखान वर छापा (५ एप्रिल १६६३). शाइस्तेखान स्वराज्यातून परत माघारी दिल्ली ला. ३ वर्षाच्या मोगली जुलमामधून स्वराज्याच्या रयतेची सुटका
इसवी सन १६६४
शिवाजी महाराजांची धाड थेट अतोनात श्रीमंत अशा सुरतेच्या मोगली ठाण्यावर. शाहिस्तेखानाच्या स्वारीत सलग ३ वर्ष परवड झालेल्या स्वराज्याच्या नुकसानीची दाम-दुप्पट भरपाई ह्या स्वारीतून झाली
इसवी सन १६६५
मिर्झा राजे जयसिंग ह्यांची स्वराज्यावर स्वारी - जयसिंग बरोबर महाराजांचा पुरंदरचा तह - २३ किल्ले मोगलांना द्यावे लागले
इसवी सन १६६६
शिवाजी महाराज औरंगजेब भेटीसाठी आग्र्यात दाखल - मोगली दरबारात त्यांचा अपमान होऊन नजरकैद - अत्यंत धाडसी योजना आखून औरंगजेबाच्या नाकाखालून सुटून महाराज स्वराज्यात पुन्हा दाखल
इसवी सन १६७०-७२
मराठ्यांच्या तुफानी मोहिमेत मोगल पूर्णपणे नेस्तनाबूत - पुरंदरच्या तहामध्ये मोगलांना द्यावे लागलेले सर्व २३ किल्ले स्वराज्यात परत सामील
इसवी सन १६७४
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ६ जून १६७४ ला रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक - स्वराज्याचा आणि रयतेचा राजा आता छत्रपती झाला
इसवी सन १६७७
महाराजांची दक्षिण दिग्विजय मोहीम.- कर्नाटक आणि तामिळनाडू मधल्या वेल्लोर आणि जिंजी पर्यंतचा प्रदेश स्वराज्यात
इसवी सन १६८०
चैत्र शुद्ध पौर्णिमेला ३ एप्रिल १६८० रोजी शिवाजी महाराजांचे वयाच्या ५० व्या वर्षी पुढील दिव्य प्रवासास प्रस्थान. स्वराज्याच्या आणि इतिहासाच्या एका महान सूर्याचा अस्त. राजाराम महाराजांना छत्रपती बनवण्याचा कट उधळून संभाजी महाराजांचे मंचकारोहण - पुढे जानेवारी १६८१ मध्ये स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून राज्याभिषेक
इसवी सन १६८९
संभाजी महाराजांना फितुरीने आणि एका बेसावध क्षणी मुकर्रबखान कडून अटक - मोगली कैदेत अत्यंत हाल करून शेवटी ११ मार्च १६८० ला ह्या स्वराज्याच्या छाव्याचा अंत. राजाराम महाराज स्वराज्याचे तिसरे छत्रपती - रायगडाला वेढा पडला असल्यामुळे वेढ्यातून निसटून राजाराम महाराजांचे जिंजीला प्रस्थान. जिंजी आता स्वराज्याची प्रशासकीय राजधानी
इसवी सन १६९७
राजाराम महाराजांचे जिंजीच्या वेढ्यातून पलायन - महाराष्ट्र भूमीत पुन्हा प्रवेश. साताराला स्वराज्याची राजधानी करून तिथून कारभार चालू
इसवी सन १७००
राजाराम महाराजांचा सिंहगडावर अकाली मृत्यू (३ मार्च १७००) - ५ वर्षाच्या शिवाजी महाराजांना तख्तावर बसवून स्वराज्याचा कारभार ताराबाई राणीसाहेबांकडे - मोगलांचा कडवा प्रतिकार करणे निरंतर चालू
इसवी सन १७०७
औरंगजेबाचा मृत्यू - शाहू महाराजांची जवळपास १८ वर्षाच्या कैदेतून सुटका - शाहू महाराज महाराष्ट्राकडे परत - थोड्या काळानंतर सातारा आणि कोल्हापूर अशा स्वराज्याच्या दोन सत्ताकेंद्रांची स्थापना